डान्स लावणी च्या तालावरुन अभिनयाचा ठसका उमटवणारी झाडीपट्टीतील  लावणी कलावंत मिस रस्मि रामटेके.

HomeNewsनागपुर डिवीजन

डान्स लावणी च्या तालावरुन अभिनयाचा ठसका उमटवणारी झाडीपट्टीतील  लावणी कलावंत मिस रस्मि रामटेके.

झाडीपट्टीची ही सौंदर्यवती ठरतेय रसिकांच्या गळ्यातली ताईत….
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – झाडीपट्टी रंगभूमीने  आजवर अनेक हिरे महाराष्ट्राला दिले आहेत. याच मातीतील आपल्या जिद्दीने आणि अथक परिश्रमाने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या. या लावणी कलावंत म्हणजे मिस रश्मी रामटेके लावणी डान्स हंगामाच्या माध्यमातून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या या रश्मी रामटेके यांनी आज आपल्या लावनी अभिनयाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
निस रश्मी रामटेके यांचा कलाक्षेत्रातील प्रवेश सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी लावणी डान्स हंगामा या व्यासपीठावरून आपल्या कलेची सादरीकरण  केली.
तिथूनच त्यांच्यातील झाडीपट्टीतील लावण्यवती सुप्त सौंदर्याची खान आज झाडीपट्टी रंगभूमी वडसा व्यावसायिक लावणी शो व डान्स हंगामा या कार्यक्रमांमध्ये पदार्पण केले आणि मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या  (मुजरा माझ्या लावणीचा ) या कार्यक्रमामधून कौशल्याची प्रचिती त्यांनी अनेक नाटकामध्ये त्यांचा लावणी शो बघायला मिळतो  त्यांनी आपल्या लावणी शोच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची अष्टपैलू सिद्ध केले. आज झाडीपट्टीतील लावणी कलावंत रश्मी रामटेके हे नाव केवळ एक अभिनेत्री नसून यशाचे एक समीकरण बनले आहे. त्यांच्या लावणी कला जिवंतपणा आणि रसिकांनी जोडलेले नाते त्यामुळे त्यांचे आज खऱ्या अर्थाने लाखो लोकांच्या  चाहती झाल्या आहेत. अथक परिश्रमाने लावणी कलेप्रति असलेले निष्ठा या जोरावर त्यांनी झाडीपट्टीच्या कलाविश्ववात आपला एक वेगळा  ठसा निर्माण केला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page