गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील आमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले .शिबिराच्या सुरुवातीला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी लेझीम च्या तालात पाहुण्यांचे स्वागत केले .सतीश साळवे तहसीलदार पवनी यांच्या उपस्थितीत एकूण487प्रकरण निकालात काढण्यात आले नागरिकांना विविध सातबारा , नमुना आठ अ , फेरफार, जातीचे, उत्पन्नाचे अधिवास प्रमाणपत्र ,संजय गांधी रोजगार ,शिधापत्रिका, सनद वाटप, आरोग्य तपासणी, आधार कार्ड दुरुस्ती ,ॲग्री ट्रॅक, पीएम किसान अर्ज स्वीकारणे ,लक्ष्मी मुक्ती , योजनेचा लाभ देण्यात आला. सदर कार्यक्रमाला नायब तहसीलदार शुभदा धुर्वे, प्रमोद राऊत, नायब तहसीलदार सर्व ,मंडळ अधिकारी उपस्थित होते. सदर शिबिरात 487 नागरिकांना सामाजिक अर्थसहाय्य योजना 30,जिवंत 7/12 टप्पा 1 -11,जिवंत सातबारा टप्पा 2 -13 ,डिजिटल स्वाक्षरी 7/12,8अ 162 ,प्रलंबित फेरफार 32 भोगवटदार वर्ग 2 चे 1 मध्ये रूपांतर 01, जातीचे उत्पन्न, अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी योजना शिधापत्रिका, सनद वाटप, आरोग्य तपासणी, आधार कार्ड दुरुस्ती, ॲग्री ट्रॅक 10, पीएम किसान अर्ज इत्यादी प्रकरण निकाली काढण्यात आले.

महसूल विभाग, कृषी विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभाग, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, आमगाव आदर्श मंडळातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय सर्व विभागाचे पदाधिकारी, संगीता नवघरे जिल्हा परिषद सदस्या, तहसीलदार श्री सतीश साळवे , नायब तहसीलदार प्रमोद राऊत, नायब तहसीलदार शुभदा धुर्वे , तालुका भूमी अभिलेख अधीक्षक श्री ,कापसे , भुयार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मोनिका भुणकर , प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी , भाग्यश्री कहूरके ,सामाजिक कार्यकर्ते शबाळकृष्ण फुलबांधे, शभगवान जी नवघरे,मंडळ कार्यालय आमगाव चे मंडळ श्री एच. आय खोंडे , ग्राम महसूल अधिकारी प्रतिमा गायकवाड , ग्राम महसूल अधिकारी मेंढेगाव शुभांगी बुरडकर, ग्राम महसूल अधिकारी बेटाळा गिरीश मांढरे, ग्राम महसूल महसूल अधिकारी निमगावं सिराज खान ,जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कढव सर्व शिक्षक वृंद, सर्व आशा वर्कर पोलीस पाटील, आमगाव आ. ग्रामपंचायत कार्यालयचे सरपंच ललिता खोडकर , उपसरपंच श्री अमोल जीवतोडे व ईतर कर्मचारी ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी कु. प्रतिमा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभदा धुर्वे नायब तहसीलदार पवणी यांनी केले.. सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल प्रशासनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


COMMENTS