गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : येथील शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात या वर्षीचा बेस्ट स्टुडंट ऑफ दी इयर २०२६ चा स्व.गंगाबाई दोरखंडे पुरस्काराची मानकरी सायली रोगे ठरली आहे. महाविद्यालयातर्फे १० हजार रुपये रोख पारितोषीक आणि स्मृतिचिन्ह देऊन तिला सन्मानित करण्यात आले.द्वितीय पुरस्कार ३ हजार रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह मोहन कोंगरे याला तर तृतीय पारितोषिक २ हजार रुपये सन्मानचिन्ह आणि कल्याणी जाभारे हिने पटकाविले. तर प्रोत्साहनपर बक्षीस व स्मृतिचिन्ह भूमी वासाडे हिला देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयांकडून रोख रक्कम तर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांचेकडून सर्व स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कल्याणी मोहरील व शुक्ला मॅडम यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीधराव गोडे, कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार ओमप्रकाश गोंड तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाश जाधव,सहसचिव माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, कोषाध्यक्ष साजीद बियाबानी, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ.राजेश खेरानी, गुरुनानक महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भास्कर बहिरवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, प्रा.डॉ.विश्वास शंभरकर, प्रा.डॉ.संजय लाटेलवार प्रा.डॉ.विशाल दुधे, प्रा.डॉ.संजय शेंडे, प्रा.डाॅ. सारिका साबळे, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, माजी आमदार तथा कार्याध्यक्ष संजय धोटे,ज्येष्ठ संचालक दत्तात्रय येगीनवार यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. श्री शिवाजी महाविद्यालयांकडून १५ हजार रुपये रोख तर २००२ पासून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांचे कडून स्व. गंगाबाई दोरखंडे स्मृती पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.

COMMENTS