गौतम नगरी चौफेर – देवेंद्र फडणवीस मानो अथवा न मानो !पण आता सरकारी कार्यालयात आणि मंत्रालयात सुद्धा नियोजन बद्ध भ्रष्टाचार चालू आहे.झिरवाळ भोळे आहेत.म्हणून पकडले गेले.मला असे वाटते,असा अनुभव येतो कि मुळातच भ्रष्टाचार करण्यासाठीच सरकार बनवले जाते.चालवले जाते. राजकारण, निवडणूक,सत्ता याचा मुख्य हेतूच भ्रष्टाचार,चोरी असा आहे.”ना खाऊंगा,ना गाने दूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींचा सुद्धा!
कोणत्याही मंत्री ला पीए आणि ओएसडी दिलेले असतात तेच मुळी हप्ते वसुली,कमीशन वसुली साठीच.बाई बाटली साठी स्वतंत्र पीए आणि मंत्री असतात.पुरी सारखे.हे पीए आणि ओएसडी याच व्यापात असतात.तसे करायला त्यांना मंत्री रोज फोन करतात.
तो बदली साठी आला होता, त्यांचे काय झाले?तो रस्त्याचा ठेकेदार भेटला का?नसेल तर बोलवून घे.काल काही पाकिट वगैरे आले का? नसेल तर फोन करा तिकडे.आम्हाला विसरले कि डावलले?विचारा त्यांना.आपला आजचा दौरा कुठे कुठे आहे?ते आंदोलन करणाऱ्यांना तुम्हीच उत्तर द्या.मला त्यांची कटकट नको.च्यायला!यांची फालतू कामे करायची कि आमची कामे करायची?तो कोणी शिवराम पाटील नावाचा माणूस आहे म्हणे, मंत्री ला काहीपण बोलतात. मंत्री ला सांगतात,या जळगाव ला !तुमचे हप्ते जमा करून देतो.खान पान बाटलीची सोय करतो.असे बोलायचे असते का?अरे कारे करतात.कलेक्टरला फोन करून सांगा कि,काय ते त्यांचे प्रकरण परस्पर मिटवा.नाही तर बदली करीन म्हणावे तुमची.
असा दम पीए ला रोज मिळतो.तो ऐकतो.तसे काम करतो.कारण त्याला पण लाडू मोजतांना भुगा पडतो, तो खाता येतो.
कनिष्ठ अधिकारीने काम नाही केले किंवा चुकीचे केले तर आपण वरिष्ठ कडे तक्रार करतो.तेंव्हा तो वरिष्ठ कनिष्ठ पेक्षा जास्त शिकलेला , जास्त अनुभव असलेला, जास्त जबाबदार असतो.आपली तक्रार त्याला ताबडतोब कळते.कारण या भ्रष्टाचारात तो पण सहभागी असतोच.म्हणून तो काम करण्याचा विचार न करता,हे प्रकरण कसे झाकायचे,कसे टाळायचे याचा विचार करतो.माझी तक्रार तो वाचतो.तेंव्हा मी त्या चोराचा चेहरा वाचतो.मला कळते.म्हणून म्हणतो, साहेब, तुम्हाला तुमचा वाटा हिस्सा मिळाला का?
काळ्या चोरांना एकमेकांचे इशारे अंधारात कळतात. सफेद चोरांना उजेडात कळत नसतील का? तरीपण तो वरिष्ठ अधिकारी लिहीतो, “योग्य ती कारवाई करावी.तक्रारदाराला तुमच्या स्तरावर कळवावे.”असे लिहीणारा अधिकारी कामचोर, हरामखोर असतो.असा शेरा मारणारा अधिकारीची तेथेच धज्जी उडवली पाहिजे.
मंत्री सुद्धा असेच लिहीतो.” योग्य ती कारवाई करावी.”याचा अर्थ असतो, यांचेकडून वसुली झाली असेल तर ताबडतोब इकडे पोहोचवावी.या तक्रारादाराचे काम करावे अथवा न करावे,फुकट करावे किंवा घेऊन करावे, यासाठी वेगवेगळ्या शाईचे पेन वापरले जातात.कधी कधी शेरा मारताना एक दोन लाईन किंवा ठिपके मारले जातात.यावरून संबंधित अधिकारी ने समजावे,काय करायचे ते.नाही कळले तरच मंत्री ला फोन करतात.
अनेकदा हे मंत्री त्यांचा शेरा तक्रारदाराला पाहू देत नाहीत.सांगत नाहीत.फोटो किंवा झेरॉक्स देत नाहीत.येथे नक्कीच भ्रष्टाचार दडलेला असतो.चोर येथेच जाणावा!
आमदार, खासदार मंत्री जरी आपल्याच जातकुळीचे असले, आपल्याच गाव शिवचे असले तरीही ते त्या पदावर गेले कि स्वताला इंग्रजांची अनौरस औलाद असल्यासारखे धंदे करतात.काल परवा आमच्या सोबत गावठी पिणारा पाटील आज मंत्री झाल्यानंतर हवेत उडतो.यांना जमीनीवर आणण्याची गरज आहे.
मी एकदा कोर्टात न्यायाधिशांना पत्र दिले.आमच्या विरोधात कोणताही पुरावा नाही.म्हणून आम्हाला चार्जशीट मधून इलिमिनेट करण्यात यावे.त्यावर त्यांनी शेरा मारला.”Quote provision, under which section?”यांचे प्रोव्हीजन आणि सेक्शन मी शिकवायचे का?ते मला वाचायला दिले.मी गुपचूप फोटो काढला.जेणेकरून प्रींट काढता येईल.न्यायाधिशांनी माझ्यावर लक्ष ठेवून तो फोटो करायला लावला.वरून दम दिला.हा कोर्टाचा गोपनीय दस्तावेज आहे.तो तुम्हाला असा फोटो घेता येणार नाही.
कमाल आहे! मी लिहिलेला अर्ज न्यायाधीश घेतात पण त्यांनी त्यावर शेरा मारलेला मला प्रींट काढता येत नाही.
भारतीय संविधान,भारतीय नागरी संहिता,भारतीय नागरी न्याय संहिता,भारतीय पुरावा कायदा असे एकतर्फी वापरले जातात.हे न्यायाधीश,फिर्यादी, आरोपी आणि पब्लिक असे चार स्तरावर ओपन झाले पाहिजे.हा सुर्य आणि हा जयद्रथ!
अवैध,अनैतिक,अमानवी अशी प्रकरणे आता एपस्टीन फाईल म्हणून उघड होऊ शकतात तर मग सरकार आणि जनता यामधील कामकाज गोपनीय का? गोपिनाथ ठेवणे, दुष्ट हेतू आहे.नियोजनबद्ध भ्रष्टाचार करणे!
मला वाटते,भारतीय लोकशाही ७५ वर्षांची झाली तरीही अजूनही नादान आहे.ती प्रौढ झालीच नाही.म्हणून ज्याच्या हाती सत्ता तोच शिकारी असतो. आता या शिकारीची शिकार करणे आवश्यक झाले आहे.सावज धाडसी झाले पाहिजे. लांडगा,कोल्हा, बिबट्या,चित्ता,वाघ यांना पिंजऱ्यात घेणे आवश्यक आहे.जसा आता झिरवाळ यांचा लांडगा पकडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आताच फर्मान काढले आहे.”आमच्या (भ्रष्टाचारी) आमदार,खासदार आणि मंत्री चा सन्मान करा.”कसे शक्य आहे?
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


COMMENTS