गौतम नगरी चौफेर (दर्शील बदरे) – आवारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवारपूर परिसरात श्नीमती पुष्पाबाई नामदेवराव बदरे यांच्या घरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, न्यायनिष्ठ शासनपद्धती आणि स्त्रीसन्मानाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. दरम्यान आवारपूर शिवाजी चौकात मसाला भात वाटण्यात आला, उपस्थित नागरिकांनी “जय शिवराय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, सुशासनाची तत्त्वे आणि राष्ट्रभक्तीची शिकवण आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. भीमराव आंबेडकर बहुउद्येशीय मंडळाच्या वतीने त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आवारपूर मध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी दर्शिल बदरे, नक्ष सतपूते, संस्कृती बदरे, सानवी वानखेडे, आरोही मुन, आयुश वाढई, वचतंन्या, निधी, अर्श, वैष्नवीआणी विहान सह बालकांनी मोठ्या स्वागतात ही जयंती साजरी केली.
महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून त्यांचा इतिहास पुन्हा समाजासमोर आणला, जर फुले साहेबांनी ती समाधी शोधली नसती,
तर आज आपण ज्या अभिमानाने शिवजयंती साजरी करतो ती कदापी केलीच नसती ती आठवन येथिल या जयंती दिना निमीत्तांने करुण देण्यात आली हे खरे 🇪🇺🇪🇺




COMMENTS