दिल्ली येथील विराट मोर्चात बुलडाणा जिल्ह्यातील हाजारो बौध्द अनुयायी सामील 

HomeNewsनागपुर डिवीजन

दिल्ली येथील विराट मोर्चात बुलडाणा जिल्ह्यातील हाजारो बौध्द अनुयायी सामील 

महाबोधी महाविहार मुक्तीच्या दिल्ली येथील विराट मोर्चात बुलडाणा जिल्ह्यातील हाजारो बौध्द अनुयायी सामील

गौतम नगरी चौफेर बुलडाणा (प्रतिनिधी) – महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वश्रेष्ठ श्रध्दास्थान आहे. महाबोधी महाविहारांवर बौध्दांचाच अधिकार असून महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, यासाठी बीटी अॅक्ट रद्द झाला पाहिजे, महाबोधी महाविहार व्यवस्थापनात चेअरमन व सर्व सदस्य बौध्द असले पाहिजेत ही मागणी भंते विनायचार्य यांनी उन,पाऊस वारा यांचा विचार न करता तीनसे साठ दिवस संपूर्ण भारतामधील जिल्हा, तालुखा, गाव खेड्यावर धम्म ध्वज यात्रा काढून बुध्द गया मुक्ती आंदोलनाचा प्रचार प्रसारा व्दारे प्रबोधन करून आंदोलन उभरनारे भंते विनायचार्य यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत केलेल्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केलेल्या आव्हानाला बुलडाणा येथील भिमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण भैयासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील बुलडाणा जिल्ह्यातील हाजारो बौद्ध उपासक उपासिका नवी दिल्लीत जंतर मंतर येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौध्दांच्या विराट मोर्चात उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या निदर्शनामध्ये बौध्द भंते आणि सर्व पक्षीय बौध्द नेते उपस्थित होते. यावेळी ना. रामदास आठवले यांनी उपस्थित राहुन मोर्चेकरांना संबोधीत करीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला आपला तसेच माझ्या ॲालइंडीया रिपब्लिकन पक्षाचा तनमन धनाने पाठिंबा आहे. 

आंदोलनाला संबोधित करतांना म्हणाले की, मी सरकारमध्ये असलो तरी बौध्दांच्या प्रश्नांवर मी समाजाबरोबर आहे, या आंदोलनात मी समाजातर्फे भारत सरकारला अशी मागणी करतो की, 1949 चा बीटी अॅक्ट रद्द करावा व सर्व बौध्दांना महाबोधी महाविहार कमिटीमध्ये सामिल करुन घ्यावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मी निवेदन सादर करणार आहे की,त्यांनी बिहार सरकारला बीटी अॅक्ट रद्द करण्याचा आदेश द्यावा असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिल्लीच्या जंतर मंतर बुध्द गय मुक्ती आंदोलनाच्या स्टेज वरून केले. 

 बुध्द गया येथील महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे देशातील सर्व बौध्द जनतेच्यावतीने विराट मोर्चात बुलडाणा जिल्ह्यातील हजारो बौध्द बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात प्रमुख असलेले भारतातील सर्व प्रमुख नेते नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे मोठया संख्येने सहभागी झाले होते.यावेळी सर्व प्रमुख आंबेडकरी नेत्यांनी हजेरी लावली होती.  
 या मोर्चात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, खासदार चंद्रशेखर रावण, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार दिपाली धानोरकर, माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, कॉग्रेसचे एससी एसटी सेवेचे अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम, महाराष्ट्रातील भंते खेम धम्मो, भंते शांतीरत्न, भंते आयुपाल, भंते राहुलमित्र, भंते संघबोधी, भंते लामा आदी मान्यंवर उपस्थित होते. यावेळेस देशातील प्रत्येक कोप-यातुन आंबेडकरी जनता उत्सफुर्तपणे मोर्चात सामिल झाली होती.

COMMENTS

You cannot copy content of this page