श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन.

HomeNewsनागपुर डिवीजन

श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन.

– तीन दिवस चालणार विविध धार्मिक कार्यक्रम.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – १५ फेब्रुवारी
       राजुरा येथील श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान हे अतिशय प्राचीन व पुरातन मंदिर असून या ठिकाणी दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा तर्फे महाशिवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ.ओमप्रकाश गोंड, तहसीलदार तथा ट्रस्टी सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा व सुमित परतेकी, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन राजुरा यांची सपत्नीक उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून अरुण धोटे, नगराध्यक्ष न.प. राजुरा, दिलीप डेरकर, उप नगराध्यक्ष न.प.राजुरा, रमेश नळे, सभापती न.प.राजुरा, योगेश्वर पारधी, स्वामी येरोलवार, मारोतराव येरणे, अध्यक्ष, देखरेख समिती, गजानन येरणे, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, तसेच देखरेख समितीचे प्रकाश बेजंकीवार, उपाध्यक्ष, भाऊराव बोबडे, सचिव, प्रशांत गुंडावार, सह सचिव, सदस्य भाऊराव खाडे, बापूजी कुचणकर, रामचंद्र आदे, हर्षल क्षीरसागर क्रीडा शिक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

तहसीलदार तथा ट्रस्टी व पोलिस निरीक्षक यांनी सपत्नीक सोमेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक, घटाची पूजा व महाआरती केली. यावेळी शिवाज्ञा वाद्य पथक राजुरा व महेंद्र भादीकर यांनी महाआरती गायन व ढोल वादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूजी कुचणकर व बादल बेले यांनी केले. यावेळी आयुष गजानन येरणे याने ६९ व्या राष्ट्रीय नेटबॉल शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक संपादन करून राजुरा व महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शॉल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिक यांचाही सत्कार केला. दिनांक १५ फेब्रुवारी ला सायंकाळी ७ वाजता महेंद्र भादीकर प्रस्तुत साईलीला भजन संध्या आहे. दिनांक १६ फेब्रुवारी ला सायंकाळी ७:३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार श्री. सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन आहे. तर दिनांक १७ फेब्रुवारी ला पहाटे अग्निकुंडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महाशिवरात्री उत्सवात मोठ्यासंखेने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान देखरेख समिती राजुरा , सोमेश्वर युवक सेवा मंडळ राजुरा , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page