गौतम नगरी चौफेर – कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या पिपरी (नारंडा) येथिल ग्रामपंचायतीत प्रभारी ग्रामसेवक विजय डांगे सदर हे मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांचा प्रभार काढून दुसऱ्या नविन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याबाबत येथिल प्रफुल चांदेकर यांनी कोरपना तहसिलदार व या क्षेञाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांना एका सविस्तर निवेदानाने ही मागणी केली आहे सदर पिपरी (नारंडा) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे विविध विकास कामाचे वेळापञक नागरीकांना कळवत नाही& ग्रामपंचायतीत कधिही येतो व कधिही निघून जातो येथील नागरीक आता येईल मग येईल या आशेत कधिकधी दिवसभर तातकळत असल्लाचे
येथील नागरीक आरोप करीत आहेत करीता आपण यांची लवकर उचल बांगडी करावी सदरची उचलबांगडी न केल्यास मी दलित आघाडिच्या वतिने अन्यथा दिनाक २० फेब्रुवारी २०२६ पासुन अन्नत्याग उपोषण करण्यात येईल असे सविनय निवेदनात सादर करण्यात आले
आहे, त्यापासून निर्माण होणा-या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी सबब निवेदन सादर
👉विजय डांगे यांचा प्रभारी ग्रामसेवक
तात्काळ प्रभार काढून घेण्यात यावा व नविन ग्रामसेवकाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी अन्यथा दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासुन अन्नत्याग उप्पोषण करण्यात येईल व त्यापासून निर्माण होणा-या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी सबब निवेदन सादर👈
प्रफुल चांदेकर महामंञी दलित आघाडी
कोरपना(भाजपा)
COMMENTS