अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने मौजा कुकुडसाथ येथील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने मौजा कुकुडसाथ येथील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार

गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – कुकुडसाथ ता. कोरपना जि चंद्रपूर येथील स्थळ शेतकरी भवन येथे मंगळवार तारीख २७ जानेवारी २०२६ ला रात्रो ०८ : ०० वाजता आदिवासी समाजाच्या सल्लाशक्ती कार्यक्रमात अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने गावातील प्रतिष्ठित मंडळीचा सत्कार करण्यात आला. दौलत गुलाराम सोयाम यांच्या अध्यक्षतेखाली शंकर आत्राम यांच्या समवेत प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी दैवत सल्लाशक्ती यांची पुजा व पुष्पहार हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यानंतर प्रमुख पाहुणे वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष चंपतभाऊ राजुरकर, दौलत सोयाम, शंकर आत्राम, आकाश ताकसांडे, प्रमोद देवेकर, मुख्याध्यापक प्रकाश चव्हाण, कृष्णा शा. गर्जे शिक्षक, सतीश व.राजने ग्राम महसूल अधिकारी, सौ.कविता प्र. लखमापूरे अंगणवाडी सेविका, सौ.जयश्री अ.गोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दिनेश जं.कोटनाके ग्रामसेवक, लाईनमन प्रणय भ. जावलीकर, गजानन आस्वले, सुभाष आस्वले, भिमा आत्राम, यशवंत चवले, महादेव चवले, प्रभाकर लखमापूरे, जितेंद्र मुठलकर पो पा इत्यादींना विचारमंचावर स्थानापन्न करून पुष्पगुच्छानी स्वागत करण्यात आले.

मौजा कुकुडसाथ येथील गावाच्या विकासासाठी योगदान देणारे प्रतिष्ठित मंडळी प्रकाश चव्हाण मुख्याध्यापक, कृष्णा शा. गर्जे शिक्षक, सतीश व.राजने ग्राम महसूल अधिकारी, सौ.कविता प्र. लखमापूरे अंगणवाडी सेविका, सौ.जयश्री अ.गोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दिनेश जं.कोटनाके ग्रामसेवक, प्रणय भ. जावलीकर लाईनमन इत्यादींचा वाहन चालक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मण आत्राम, जितेंद्र टेकाम, सौरव आत्राम, विकी आत्राम, सुनंदा सोयाम, सविता टेकाम, जया आत्राम, बादल टेकाम, भाऊराव सोयाम, केदाजी आत्राम, अजय सोयाम, समीर भोयर, संकेत कटाईत, अमोल निब्रड, मयूर टेकाम, अमोल गौरकर, अभिषेक गोरे, शालीक सोनटक्के, निखिल चापले, कविता लखमापूरे, मंदा आत्राम मोलाचे योगदान दिले.

सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे औचित्य साधून यापूर्वी घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांत फार मनमोहन नृत्य सादर केले. यावेळी गावातील मंडळींकडून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाला गावातील लहान थोर मंडळीनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

COMMENTS

You cannot copy content of this page