जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त पायाभूत सुविधांची तपासणी केली

HomeNewsनागपुर डिवीजन

जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त पायाभूत सुविधांची तपासणी केली

गौतम नगरी चौफेर/शिला धोटे// – पंचायत समिती कोरपना येथील माजी गटशिक्षणाधिकारी तथा गडचांदूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय कल्याण जोगदंड साहेब यांनी जिल्हा परिषदेचे उच्च प्राथमिक शाळा कढोली (खुर्द) येथे दिनांक 15 ऑक्टोंबर 2026 ला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी मिशन अंगणवाडी – शाळा सक्षमीकरण (MASS) – 2 उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त पायाभूत सुविधांची तपासणी केली. या तपासणीत त्यांनी शाळा मूल्यांकन प्रपत्र अंतर्गत विविध अतिरिक्त भौतिक सुविधा व शाळा विकास आवश्यकता याबाबत शाळेतील शिक्षकांबरोबर चर्चा करून प्रत्यक्ष वर्ग खोल्या व इतर भौतिक सुविधा पाहून प्रपत्र भरण्यात आले. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेमध्ये चालणारे विविध उपक्रमाची माहिती जाणून घेतली. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील राहून शैक्षणिक कार्य करावे असे मार्गदर्शन त्यांनी केले. शाळेतील उपक्रमशील शिक्षक वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी शाळेमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांना माहिती दिली. यामध्ये आदर्श परिपाठ, निपुण महाराष्ट्र. आनंददायी दप्तर मुक्त शनिवार, वाचनालय, पालक संपर्क, पालक सभा, माता पालक गट, परसबाग, विज्ञान लॅब, विविध शिष्यवृत्तीचे सराव वर्ग, नवरत्न स्पर्धा बाल क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारीची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी विविध विषयावरती संवाद साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला व योग्य मार्गदर्शन केले. शाळेचा सुंदर परिसर पाहून समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page