दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर

HomeNewsनागपुर डिवीजन

दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर

– भिक्खू संघाच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थिकलश यात्रा
गौतम नगरी चौफेर शिला धोटे चंद्रपूर –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी आणि दीक्षाभूमी विहार विकास समितीच्या वतीने आयोजित धम्मचक अनुप्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला अवधी चंद्रपूर नगरी ‘बुद्ध सरण गच्छामि’ आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने आणि निल्या पाखरांच्या पंखांनी सुखावून गेली. समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्धाने मानवी मूल्यांचा नवा जागर घडवला.

शुक्रवारी सकाळी या सोहळ्याची सुरुवात आत्यंत शिस्तबद्ध आणि चैतन्यमय वातावरणात झाली. संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या नेतृत्वात, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह भिक्खु संघ आणि समता सैनिक दलाच्या शौर्यशील पथसंचलनाने एका मिरवणुकीला प्रारंभ झाला. बाबासाहेबांच्या आणि वं. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला मालार्पण करून, सामूहिक बुद्धवंदनेनंतर ही शिस्तबद्ध मिरवणूक जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक आणि वरोरा नाका मार्गे समता सैनिक दलांच्या शिस्तबध्द संचालनाने ही मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचली.

संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांचा पवित्र कलश बुद्ध विहारात जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या धम्मचक्र अनुवर्तन समारंभाच्या मुख्य सोहळयात यंया एक बदल पाहायला मिळाला. या सोहळ्यात पंथा प्रथमच राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. राजकीय नेत्याऐवजी व्यासपीठावर आंबेडकरी विचारवंत, नामवंत साहित्यिक आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

विद्याथ्यांनो भदन्त ससाई यांना मानवंदना दिली आणि बाबासाहेबांच्या चळवळीशी सदैव एकनिष्ठ राहण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक बुध्दवंदनेने झाली त्यानंतर हेमंत शेडे आणि त्यांच्या संचाने सादर केलेल्या स्फूतगोतांनी अवधा जनसमुदाय धम्ममय झाला.
मुख्य सोहळ्यात बोलताना श्रद्धेय भदन्त आर्थ नागार्जुन सुरेई ससाई यांनी उपस्थित लाखो बौद्ध बांधवांना धम्म आचरणाचा संदेश दिला. याप्रसंगी भदत सुमनवन्नो महासचिव महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ), धम्म सेना नायक भवन्त नागशोन, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त प्रज्ञाबोधी, भयन्त महानागा, भवन्त बुद्धायोप, भन्ने धम्मत्रिया आणि भिक्खूसंघाची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, सचिव वामनराव मोडक, उपाध्यक्ष कुणाल घोटेकर, मुख्य प्रवर्तक (संविधान जागर उपक्रम) अशोक घोटेकर, सदस्य शैलेंद्र शेंडे, राकेश गेडाम, डॉ. राहुल घोटेकर आणि प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर उपस्थित होते. या मुख्य प्रवेश सत्राचे संचालन डॉ. सदाफळे यांनी केले. तर आभार प्रा. रोशन गजभिये यांनी मानले.

दुपारच्या सत्रात ‘त्रिरत्न धम्मक्रांती आणि भारतीय संविधान’ या अत्यांत संवेदनशील आणि परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रवी कांबळे, वैचारिक विषयावर परिसंवाद पार पडला. या भदन्त डॉ. वण्णासामी, डॉ. जसबीरसिंग चावला, डॉ. आनंद भालेराव यांनी आपल्या अनुबंध अधोरेखित केला. या वै प्रगल्भ विचारांतून धम्मक्रांती आणि संचालन प्रा. योगपती बारसागडे यांनी केले आणि आभार प्रा,भारत मुन यांनी मानले.

You cannot copy content of this page