गडचांदूरात सुप्रभा व्यसन मुक्ती केंद्राचे थाटात उद्घाटन

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूरात सुप्रभा व्यसन मुक्ती केंद्राचे थाटात उद्घाटन

संतोष पटकोटवार (गौतम नगरी चौफेर) गडचांदूर – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक वैशाली नगर येथे गोदाई बहूऊदेशीय संस्था गडचांदूर द्वारा संचालित सूप्रभा व्यसन मुक्ती केंद्राचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेचे उपाध्यक्ष संजय मधुकरराव मेंढी कार्य कर्माचे उद्घाटक नगरपरीषदेचे नगर अध्यक्ष श्री निलेश शंकरराव ताजने व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संदीप भाऊ शेरकी श्री नवनाथजी मंदे.सौ.कूंतल चव्हाण शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार ह.भ.प.डाखरे महाराज हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन सुप्रभा व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष श्री प्रभाकर काकडे, सचिव सूनिता प्रभाकर काकडे, कोषाध्यक्ष संतोष चिडे, सदस्य श्रीमती मालताबाई चिडे, प्रवीण बरडे, रामचंद्र काकडे, दिपक चिवाने इत्यादी संचालक मंडळाच्या सदस्यांनी केले असून गडचांदूरात युवापिढी व्यसनाच्या आहारी जात असून या व्यसनाला आळा घालण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्राची अत्यंत गरज असुन सर्व सुप्रभा व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालक मंडळाचे अभिनंदन नगरपरिषदेचे नगर अध्यक्ष निलेश शंकरराव ताजने यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद पत्रकार तर आभार प्रदर्शन सौ सूनिता प्रभाकर काकडे यांनी केले

You cannot copy content of this page