राजुरा पोलिसांची धडक कारवाई : ६.५१ लाखांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा पोलिसांची धडक कारवाई : ६.५१ लाखांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ११ जुलै राजुरा शहरातील इंदिरानगर वार्ड राजुरा रोडच्या बाजूला परिसरात सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत तब्बल ६ लाख ५१ हजार ८९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत शासनाने बंदी घातलेल्या विविध ब्रँडच्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एमएच ३४ एए ४९९६ क्रमांकाची मारुती सुझुकी इको कार इंदिरानगर रोड च्या बाजूच्या परिसरात थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनाच्या डिकीत व मागील सीटखालील प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये शासनबंदी असलेला मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व पानमसाला आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये ANNI Gold Sweet Supari, Signature Finest Pan Masala, राज निवास पान मसाला, राजश्री पान मसाला, Black Label 18-KP, ZN-01 Zafrani Zarda, Bajirao Flavoured Pan Masala Gold, ACTZON Premium Chewing Tobacco, विमल पान मसाला, V-1 तंबाखू, मस्तानी तंबाखू आदी विविध ब्रँडच्या पानमसाला व तंबाखू उत्पादनांचा समावेश आहे. या प्रतिबंधित मालाची किंमत १ लाख ५१ हजार ८९१ रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ५ लाख रुपये किमतीच्या मारुती सुझुकी इको कारसह एकूण ६ लाख ५१ हजार ८९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक इश्वर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रणय दामोदर कांबळे व पथक अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर व गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम , पोहवा विक्की निर्वाण , पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफिक शेख , मिलिंद जांभूळे , महेश बोलगोडवार , शरद राठोड, रमेश बस्सी यांनी केली आहे.

गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रमेश तुमसाम, पोलीस अंमलदार व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
राजुरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शासनबंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page