राजुरा गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई : चोरीस गेलेले ४० हजारांचे टिनपत्रे जप्त.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई : चोरीस गेलेले ४० हजारांचे टिनपत्रे जप्त.

– दोन आरोपी अटकेत.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि. २७ जून राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर कारवाई करत बांधकाम साईटवरून चोरीस गेलेले सुमारे ४० हजार रुपये किमतीचे ४० टिनपत्रे जप्त केली असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी हातीम मोईज जकेरी (वय २८) यांनी राजुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मानिकगड रेल्वे साईडिंग येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी ठेवण्यात आलेले निळ्या रंगाचे ३×८ फूट आकाराचे ४० टिनपत्रे अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली. प्रत्येक पत्र्याची किंमत अंदाजे १ हजार रुपये असून एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५७५/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान सौरभ चंद्रभान वडस्कर (वय २२) व यश सुधाकर बांदरे (वय १९), दोघेही रा. चुनाळा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
आरोपींकडून चोरीस गेलेले ४० टिनपत्रे जप्त करण्यात आले असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक इंद्रजित काकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे सपोनि लक्ष्मण लोहरे, सपोनि किशोर तुमराम, पोहेकॉ विक्की निर्वाण, पोहेकॉ अनुप डांगे, पो.अ. महेश बोलगोंडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बसरी व राजीव दुबे यांनी पार पाडली.

You cannot copy content of this page