बैलावर बसून फिरणाऱ्या व्यक्तीची चर्चा.

HomeNewsनागपुर डिवीजन

बैलावर बसून फिरणाऱ्या व्यक्तीची चर्चा.

पोलिस स्टेशन व राजुरा तहसील कार्यालयात बैलावर बसून कर्जमाफी च्या दिल्या घोषणा.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि. 23 जून राजुरा शहरातील पोलिस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे एका आज एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. एका व्यक्तीने पांढऱ्या बैलावर बसून रस्त्यावरून फेरफटका मारल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. परिसरातील अनेकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली तसेच काहींनी आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रे व व्हिडिओही टिपले.
सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे युग असताना पारंपरिक पद्धतीने बैलावर स्वार होऊन फिरणारी व्यक्ती पाहून नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. या अनोख्या दृश्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान बैल शांत स्वभावाचा असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे प्राण्यांवर स्वार होताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. या अनोख्या प्रसंगाचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनले आहे. तसेच संपूर्ण कर्जमाफी च्या जोरदार घोषणा व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतांना चक्क तहसील कार्यालयात बैलावर बसून घोषणा देताना लक्षवेधी ठरले. या प्रकरणात काय कार्यवाही केली याबाबत सर्वसाधारण नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.

    You cannot copy content of this page