रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाची अंबरनाथ शहर कार्यकारणी जाहीर

HomeNewsनागपुर डिवीजन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाची अंबरनाथ शहर कार्यकारणी जाहीर

गौतम नगरी चौफेर अंबरनाथ दि. 22 (प्रतिनिधी)
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आणि ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या सूचनेनुसार, ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांनी अंबरनाथ शहर कार्यकारणी घोषित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सह सचिव राहुल हंडोरे होते.

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकी नंतर काही अपरिहार्य कारणामुळे जिल्हा कार्यकारणीने अंबरनाथ कार्यकारणी बरखास्त केली होती त्या मुळे पक्षाचे काम थंडावले होते. रिपब्लिकन पक्षाला पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी पक्षाचे जुने नवे कार्यकर्ते यांना एकत्रित करून अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्ष पदासाठी तीन नावे आली होती. या तिन्ही पदाधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून एकमताने प्रवीण गायकवाड यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित केले त्या नंतर अंबरनाथ शहर कार्यकारणी घोषित करण्यात आली.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी नुकतेच कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पक्षात सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी करून घ्या. त्यानुसार अंबरनाथ शहर कार्यकारणीवर सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी करून घेण्यात आले.

भटक्या विमुक्त समाजाचे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर अल्पसंख्याक अध्यक्षपदी बिस्मिल्ला उमर शेख तर उपाध्यक्ष पदी अली शेख यांची निवड करण्यात आली. इतर कार्यकारणी खालील प्रमाणे निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष रवी गायकवाड तर सरचिटणीस म्हणून कमलाकांत बनसोडे यांची निवड झाली. सचिव दिलिप जाधव, सह सचिव तेजस सरवदे, खजिनदार शरद गायकवाड तर सल्लागार म्हणून दादासाहेब देठे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष पदावरून बोलतांना राहुल हंडोरे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष दिवंगत नरेश गायकवाड यांच्या कार्यकाळात रिपब्लिकन अंबरनाथ शाखा जिल्यात एक नंबरवर होती. त्या काळात आगळी वेगळी भाऊबीज सारखे कार्यक्रम होतं असत. त्या नंतर अजय जाधव यांनी त्यांची परंपरा पुढे चालवली. त्याच प्रमाणे नवीन कार्यकारणीने पक्षाची धुरा सांभाळावी असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

राज्य सह सचिव राहुल हंडोरे आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सभेला अंबरनाथ शहर शाखेचे माजी अध्यक्ष अरविंद रमण, महिला पदाधिकारी द्रौपदी हजारे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सभेच्या शेवटी रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा निरीक्षक दिवंगत सुरेशदादा बारसिंग यांना मूक श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page