गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – गडचांदूरात शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यांनी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांचा आशीर्वाद घेऊन व शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पुष्प गुच्छ देऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आगडी वेगडी दिवाळी साजरी केली असून परीसरातील महीला .पूरूषांना व बालगोपाळांना आपल्या निवासस्थानी पाचारण करून मिठाई व फराळ वाटप करून ही दिवाळी साजरी करण्यात आली या छोटेखानी कार्यक्रमाला गडचांदूर येथील माजी सरपंच श्री चरणदास फकरूजी मेश्राम सिद्धेश्वर केंद्रे व वार्डातील महीला . पुरूष तथा बाळ गोपाळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



