१.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हे दाखल

गौतम नगरी चौफेर श्निकृष्ण देशभ्रतार भंडारा तुमसर, ता. २१: अवैध हातभट्टी दारूनिर्मितीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने गोबरवाही परिसरात कारवाई करीत १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ८४० किलो सडवा मोहफास रसायनासह इतर साहित्याचा समावेश असून, दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतशिवारात हमेषा तलावाजवळ छापा टाकला. या कारवाईत घनश्याम सदु टेकाम (वय ५९, रा. पाथरी, ता. तुमसर) याच्याकडून २४० किलो सडवा मोहफास रसायन व इतर साहित्य असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८४/२०२६ अन्वये कलम ६५ (फ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पटले, हवालदार बेदुरकर व पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
