तुमसरात रावण दहन उत्साहात

HomeNewsनागपुर डिवीजन

तुमसरात रावण दहन उत्साहात

श्रीकृष्ण देशभ्रतार( जिल्हा प्रतिनिधी)
“गौतम नगरी चौफेर” भंडारा/तुमसर :
विजयादशमी (दसरा) निमित्त शहरातील नेहरू पटांगण तुमसर येथे रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी होती.
संध्याकाळी अंदाजे ७. ३० वाजता रावणाच्या विशाल पुतळ्याचे दहन करण्यात आले. “जय श्रीराम” च्या जयघोषात रावणाचा पुतळा जळताच नागरिकांनी एकच जल्लोष केला. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या सोहळ्याला लहान मुलांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. वाहतुकीचे नियोजनही पोलिसांनी चोख ठेवले होते.

You cannot copy content of this page