गडचांदूर येथे सेतू केंद्र चालकाला लाच घेतांना अटक

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूर येथे सेतू केंद्र चालकाला लाच घेतांना अटक

– एसीबी पथकाची धडाकेबाज कारवाई… परीसरातील सेतू केंद्र चालकांचे धाबे दणाणले संतोष पटकोटवार यांनी केली कडक कारवाईची मागणी
गौतम नगरी चौफेर कोरपना तालुक्यातील
– गडचांदूर नगरी परीसरात जवळपास पंधरा शासनमान्य आधार सेतू केंद्र आहे कोणत्या दाखल्यासाठी कीती रक्कम घ्यायचे दर पत्रक शासनाने ठरवून दीली आहे. मात्र शासनाचे नियम धाब्यावर ठेवून सर्रासपणे जादा पैसे घेण्याचा सपाटा आधार सेतू केंद्र चालकानी सुरु केल्याने नागरीकात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. काही शाळकरी विद्यार्थी व वयोवृध्द निराधार व्यक्ती कडून सूध्दा नियमापेक्षा दूपट रक्कम घेत असल्याची माहीती शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हा बूरूड समाजाचे उपाध्यक्ष संतोष पटकोटवार यांना मिळाली असता अनेक वेळा दूर्लक्ष करण्यात आले मात्र मूलीच्या शैक्षणिक कामाकरीता संतोष पटकोटवार यांना उत्पन्न दाखल्याची गरज पडली असता दिनांक 31/8/2026 रोजी त्रिशा आपले सरकार सेतू केंद्राकडे धाव घेतली असता उत्पन्न दाखल्याची किंमत दोनशे रुपये असल्याची केंद्र संचालक सचिन खैरे यांनी सांगितले. उत्पन्न दाखल्याची शासकीय रक्कम निवड एकोनसत्तर रुपये असताना दोनशे रुपये देण्याची मूळीच इच्छा नसल्याने संतोष पटकोटवार यांनी लाचलूचपत प्रतीबंधक विभाग चंद्रपूर यांचेकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली असून दिनांक 7/9/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता दरम्यान सापळा रचुन त्रिशा सेतू आधार केंद्राचे संचालक श्री सचिन खैरे यांना संतोष पटकोटवार यांच्या कडून 69/ एकोणसतर रुपये उत्पन्न दाखल्याची किंमत व 81एक्यांशी रुपये लाच असा एकूण एकशे पनास रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गडचांदूर पोलिस स्टेशन येथे सचिन खैरे यांच्या वर रात्री उशिरा पर्यंत गून्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असुन परीसरातील आधार सेतू केंद्र संचालकाचे धाबे दणाणले.संबधीत तहसीलदाराने सेतू केंद्र चालकावर लक्ष केंद्रित करून शासनाने ठरवून दिलेल्या शूल्क आकारणी पेक्षा जादा पैसे घेण्यात येऊ नये व शाळकरी विद्यार्थी व वयोवृध्द निराधार व्यक्ती कडून सूध्दा नियमापेक्षा दूपट रक्कम कोणत्याही सेतू केंद्र संचालकाने घेऊ नये अशी विनंती शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हा बूरूड समाजाचे उपाध्यक्ष संतोष पटकोटवार यांनी केले

You cannot copy content of this page