डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार – आण्णा बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष)

HomeNewsनागपुर डिवीजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार – आण्णा बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष)

गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे मुंबई दि.2 सप्टेंबर 26 ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे जांभूळ येथे इंग्रज राजवटीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मालकी असलेल्या जमिनीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उचित स्मारक करणे बाबतचा शासनाकडे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष ना. आण्णा बनसोडे यांनी मुंबईत विधानभवन येथे डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले.

ना. आण्णा बनसोडे म्हणाले की, लवकरच महसूलमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, महिला बालविकास मंत्री, ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण तहसीलदार, सर्व संबंधित शासकीय अधिकारी आणि डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक विधानभवन येथे आयोजित करून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे आश्वासन ना. आण्णा बनसोडे यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात डॉ आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, महिला प्रतिष्ठान अध्यक्षा कुसुम गौतम गेडाम, नाट्य /सीरिअल अभिनेत्री करुणा कातखडे आदिचा समावेश होता.

You cannot copy content of this page