राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी बळकटी; मोहब्बत खान यांच्यावर अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्षपदाची जबाबदारी!

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी बळकटी; मोहब्बत खान यांच्यावर अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्षपदाची जबाबदारी!

गौतम नगरी चौफेर कोरपना निखिल पिदूरकर : भारतीय जनता पक्षाच्या संघटन विस्ताराला आणखी बळ देत राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते मोहब्बत खान यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून पक्षात स्वागत करण्यात आले.

पक्षप्रवेशानंतर भाजप कोरपना शहर कार्यकारिणीत अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर मोहब्बत खान यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र पक्षाच्या वतीने प्रदान करण्यात आले. त्यांच्या संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे.

या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मोहब्बत खान यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार देवराव दादा भोंगळे यांनी पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचे आवाहन केले.
नियुक्तीनंतर मोहब्बत खान यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, अल्पसंख्यांक समाजात भाजपची विचारधारा पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना जोडणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

भाजपच्या या नियुक्तीमुळे कोरपना शहरातील संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात पक्षाची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page