मुंबईत भर पावसात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विशाल मोर्चा

HomeNewsनागपुर डिवीजन

मुंबईत भर पावसात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विशाल मोर्चा

गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे मुंबई : दि. 30 जून 26 अनुसूचित जाती- जातीत फूट पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आरक्षण उप वर्गीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी अनुसूचित जातीतील विविध संस्था संघटनांच्या वतीने 30 जून 26 रोजी मुंबईत महापालिके समोर भर पावसात विशाल मोर्चा काढण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बौद्धमहासभेचे अध्यक्ष डॉ भिमराव आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

अनुसूचित जातीमधील 29 आमदारा पैकी 27 आमदार महोदयांनी या उपवर्गीकरणाला विरोध केला असून या बाबतचे एक निवेदन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना सादर केले आहे. या बाबत आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास अनुमती नाकारण्यात आली त्यामुळे सर्व आमदारांनी सभात्याग केला.

मोर्चात माजी सामाजिक न्यायमंत्री, चर्मकार समाजाचे नेते बबन घोलप, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ऍड. सुरेश माने, रिप. नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार संजय मेश्राम, आमदार ज्योती गायकवाड, चर्मकार समाजाचे नेते संजय खामकर, रोहिदास बनसोडे, ढोर समाजाचे नेते रामचंद्र फुलपगार, सूर्यकांत गवळी, भन्ते दयानंद बोधी, नागपूरच्या महिला नेत्या कांबळे, भीम आर्मीचे अशोक कांबळे, गणेश बोरकर, रिप. खोरीपचे निरभवणे, बीड ते मुंबई लॉन्गमार्चचे आयोजक विश्वजित करंदीकर आदिची भर पावसात भाषणे झाली.

अनुसूचित जाती मधील 59 जातींचे उपवर्गीकरण करणे बाबत नेमलेल्या बदर समितीचा अहवाल स्वीकारण्यात येऊ नये. शासना मार्फत जाती जातीत भांडणे लावण्याचा हा प्रयत्न आहे असा वक्त्यांचा भाषणाचा सूर होता. ” जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भिमराव “
असे म्हणणारे साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे. आण्णाभाऊचे नेतृत्व मानणारे मातंग सामाजाच्या दोन चार पुढाऱ्यांना हाताशी धरून उपवर्गीकरणाचा घाट घेतला जात आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न उपवर्गीकरण माध्यमातून केला जात आहे. त्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध घडामोडी आयोजकांनी गौतम नगरी चौफेर न्युज ला कडविले 💙💙

You cannot copy content of this page