गौतम नागरी चौफेर गडचांदूर – आज, दिनांक २३/५/२०२६ रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे, कुंसूबीचे १९ पिडीत आदीवासी , विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या सोबत, गंभीर रिपोर्ट देऊन, में मानीकगढ सिमेंट कंपनी व अल्टाटेक सिमेंट कंपनी चे अधिकारी, श्री मुकेश गहलोत, श्री नवीन कौशिक, श्री राजेश झाडे, श्री सचिन गोवारदिपे, यांच्या विरुद्ध ऑट्रासिटीचा कलमानुसार,व दलाल भारत आत्राम यांच्या वर भारतीय न्याय संहीता अधिनियम २०२३ चां कलमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बोगस बनावट खोटे करारनामा करून में मानीकगढ सिमेंट कंपनी व अल्टाटेक सिमेंट कंपनी यांनी, अंगुठे घेऊन,रात्री ८ वाजता बुलडोझर लावून, कुंसूबी गावातील ३४ घरे, कुठलाही मोबदला न देता उद्ध्वस्त केली होती, विनोद खोब्रागडे व इतर पीडित आदिवासी यांनी अनेक वेळा गंभीर रिपोर्ट देऊनही कुठलीही कारवाई झाली नाही नुकतेच माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर व माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन दिले व कंपनी चे पदाधिकारी व दलाल विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती भारत आत्राम यांच्या या प्रकरणात काडीचाही तिळ मात्र संबध सन २०१३ पासून सन २०२६ आजपर्यंत नाही, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अयु सिडाम कडुन २०लाख रूपये, निलकंठ आत्राम यांच्या कडुन ७, लाख ७० हजार रुपये,सारजाबाई कोटनाटे कडुन ८ लाख रूपये,पगु आत्राम कडून १ लाख ७० हजार रुपये, बापुराव जुमनाके कढुन व त्यांच्या भावाकडून १६ लाख रूपये, अशा प्रकारे २२ पिडीत आदीवासी कडुन जबरदस्तीने भारत आत्राम यांनी वसुली केले आहे,व विश्वास घात केला आहे भारत आत्राम व आनंदराव मेश्राम यांच्या विरुद्ध आतापर्यंत पाच गंभीर रिपोर्ट विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर व पीडित आदिवासी यांनी पोलिस प्रशासन यांना दिली आहे आज प्रत्यक्ष ठाणेदार साहेब गडचांदूर यांना भेटून समस्या सांगितली आहे.



COMMENTS