गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – फिनिक्स करियर अँकॅडमी, साकोली यांच्या वतीने पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक सौ.संगमा आशिष वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. मा.शिवमजी इसापुरे सर (DYSP, साकोली) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर यश प्राप्त करता येते असे सांगितले.
कार्यक्रमाला संदीपजी कदम तहसीलदार साकोली , चिंतामणजी थेर (माजी गट शिक्षण अधिकारी तथा अध्यक्ष झाडे कुणबी समाज), हेमराजजी हेमने (माजी मुख्याध्यापक), वामनजी वैद्य (माजी मुख्याध्यापक), पौर्णिमा वैद्य,.शुभांगी कोदाने, सतीश उके BARTI, SARATHI, TRTI, मॅनेजर भंडारा तसेच रवीजी लिचडे संस्थापक स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी लाखनी, रजत राऊत संचालक सावित्रीबाई फुले वाचनालय पहेला या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा समारंभ पार पडला तसेच , मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रेरणा दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित थेर यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहित खोटेले यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



COMMENTS