मुक्तिधाम ते हनुमान मंदिर काँक्रीट रोडचे लोकार्पण उत्साहात संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

मुक्तिधाम ते हनुमान मंदिर काँक्रीट रोडचे लोकार्पण उत्साहात संपन्न

(माणिकगड अल्ट्राटेक कंपनीच्या CSR निधीतून ३५० मीटर रस्त्याचे बांधकाम; नागरिकांची अनेक वर्षांची समस्या मार्गी)
गौतम नागरी चौफेर संतोष पटकोटवार – कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या विनंतीला मान देत माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने आपल्या उडठ निधीतून मुक्तिधाम पासून हनुमान मंदिरापर्यंत सुमारे ३५० मीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या काँक्रीट रोडच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मसाला भात व जिलेबीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निलेश भाऊ ताजने उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष संजय भाऊ मेंढी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा सभापती शेख सरवर भाई, बांधकाम सभापती रामसेवक मोरे, माणिकगडचे ए.ठ. हेड नविन कौशिक, नगरसेवक महेश भाऊ आवारी, गटनेते सतीश भाऊ बेतावार, नगरसेवक चेतन शेंडे, नगरसेविका सारिका डोरलीकर, अश्विनी कांबळे, संगिता गाऊतरे, शेख खाजाभाई, संदीप भाऊ शेरकी, संतोष पटकोटवार, महादेव जयसवाल, महादेव एकरे, कुणाल पारखी, इमरान पाशा, नितीन डोरलीकर यांच्यासह शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माणिकगड अल्ट्राटेक कंपनीच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा विकासकामांमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होत असल्याचे मत व्यक्त केले.

COMMENTS

You cannot copy content of this page