गौतम नगरी चौफेर (नांदाफाटा) – कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नांदा मराठी व माजी विद्यार्थी संघ नांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “एक तास माझ्या शाळेसाठी” या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
या उपक्रमाची सुरुवात ४ मे पासून करण्यात आली असून ३१ मे पर्यंत दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव, करिअर मार्गदर्शन, आरोग्य व संस्कार अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मिळत आहे.
विशेष म्हणजे या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांसह उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावात आलेले इतर विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड वाढत असून शाळेचे वातावरण अधिक प्रेरणादायी बनले आहे.
उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शक सहभागी होत आहेत. त्यामध्ये ५ मे धनंजय डाखरे, ६ मे रोजी सचिन गोवरदीपे, ७ मे रोजी संदीप खिरटकर, ८ मे रोजी कु. नेहा वासाडे, ९ मे रोजी महेश सोनटक्के, १० मे रोजी प्रफुल विरूटकर, ११ मे रोजी गणेश लोंढे, १२ मे रोजी प्रशांत जोगी, १३ मे रोजी सतीश जमदाडे, १४ मे रोजी प्रकाश उपरे, १५ मे रोजी डॉ. प्रवीण लोंनगाडगे सर (गडचांदूर), १६ मे रोजी विकास चुने सर, १७ मे रोजी नितेश मालेकर, १८ मे रोजी संतोष अवधाने, १९ मे रोजी पंढरी मुसडे साहेब, २० मे रोजी हरीश खरवडे, २१ मे रोजी प्रा. राजेश बोले सर, २२ मे रोजी प्रा. विलास हजारे सर, २३ मे रोजी अनिल पेंदोर, २४ मे रोजी गणेश जेनेकर सर तसेच २५ मे रोजी पुष्पा गायकवाड यांचा समावेश आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघ नांदाचे अध्यक्ष मुरलीधर बोडखे, सदस्य तथा सल्लागार रत्नाकर चटप सर, नितेश मालेकर, गणेश लोंढे, सतीश जमदाळे शाळेच्या मुख्याध्यापिका कु. वैशाली तुम्मे मॅडम, भगवान नागरगोजे सर, गोविंद प्रसाद गुप्ता सर यांच्यासह शिक्षकवृंद व गावातील होतकरू माजी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार व शिक्षणाची प्रेरणा निर्माण करणारा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावा, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
🙏जिल्हा परिषद शाळा नांदा मराठीत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन.🙏..


COMMENTS