9 जून ला सन्मान द्या व सन्मान घ्या पत्रकार संजीव भांबोरे  यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा होणार सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

9 जून ला सन्मान द्या व सन्मान घ्या पत्रकार संजीव भांबोरे  यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा होणार सत्कार

पहेला येथे माजी खासदार बौधसिंग भगत, माजी खासदार खुशाल बोपचे, अभिनेत्री चैताली भस्मे, अभिनेते अश्विनकुमार वघाले  उपस्थित राहणार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे  भंडारा – सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त  विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार, कवी, लेखक , कृषी क्षेत्रातील अधिकारी,साहित्यिक, प्रबोधनकार, डॉक्टर, वकील, दिव्यांग, शैक्षणिक क्षेत्रातील  अधिकारी, यांचा समाजासाठी योगदान आहे असे कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांचा माजी खासदार बौधसिंग भगत, माजी खासदार व अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.खुशाल बोपचे, अभिनेत्री चैताली भस्मे, अभिनेते अश्विनकुमार बघाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत दिमागदार सत्कार सोहळा 9 जून 2026 ला रोज मंगळवार ला सकाळी 11  वाजता सम्यक बुद्ध विहाराच्या पटांगणात आंबेडकर वार्ड पहेला येथे  वेळेवर पार पडणार आहे. करिता सत्कार मूर्ती यांनी वेळेवर उपस्थित राहावे .सदर कार्यक्रमात जवळपास 50 सत्कारमूर्ती यांचा सत्कार करण्यात येणार आहे.असे कार्यक्रमाचे आयोजक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी का पत्रकाद्वारे  कळविले आहे

COMMENTS

You cannot copy content of this page