गौतम नागरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. शिक्षणामुळे जिवनामध्ये आमुलाग्र बदल होऊन कुटुंबासह समाजाचा विकास साधण्याची संधी उपलब्ध होते. जुन्नर तालुक्यातील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील कुमारी काव्या प्रेमलाल बोरकर या विद्यार्थिनीने दहावीच्या एस. एस. सी. परीक्षेत पाचशे गुन्हा पैकी 405 गुण प्राप्त केले. कोणत्याही विषयाची ट्युशन न लावता कुमारी काव्या बोरकर या विद्यार्थिनीनेआपल्या जिद्द आणि चिकाटीमुळे वर्गातून 81.20% मार्क घेऊन मोठे यश प्राप्त केले आहे. भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेत राहील हीच सदिच्छा! मुख्याध्यापिका बारवे मॅडम वर्ग शिक्षक दातीर सर, वर्षे मॅडम, ताजणे सर, गाडे सर, लाडे सर या सर्व शिक्षक वृंद व पालक, या विद्यार्थिनीचे मोठे कौतुक होत आहे. आयुष्याच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करीता आपतेष्टा कडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नाही तर या विद्यार्थिनीने आपल्या कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाचा नवा इतिहास घडविला आहे तुझ्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे. या पुढील प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला भरभरून यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! हार्दिक अभिनंदन! आणि उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


COMMENTS