– शंकरराव बुऱ्हाण व मंदा बुऱ्हाण यांनी जपले जुन्या भांड्यांच महत्व.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.७ मे घरातील सजावटीमध्ये पारंपरिक वस्तूंना , भांड्यांना आधुनिक पद्धतीने सादर करण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पितळी मोठ्या कलशावर आकर्षक फुलांची सजावट करून घराच्या कोपऱ्यात सुंदर मांडणी करण्यात आली आहे. कलशाच्या दोन्ही बाजूंना हिरव्या शोभेच्या रोपांची सजावट केल्याने संपूर्ण वातावरण अधिक प्रसन्न आणि आकर्षक दिसत आहे. पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक असलेला कलश आणि आधुनिक इंटेरियर डिझाइन यांचा सुंदर संगम या सजावटीत पाहायला मिळतो. रंगीत फुलांच्या मांडणीसह हस्तकलेच्या सजावटी पट्ट्यांमुळे या कलशाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
घरातील छोट्या जागेलाही कलात्मक रूप देण्यासाठी अशा प्रकारची सजावट उपयुक्त ठरत असून पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सौ. मंदा शंकरराव बुऱ्हाण यांनी आपल्या घरातील संसार उपयोगी साहित्याना अडगळीत किंवा जुनी भांडी म्हणून न विकता त्यांना घरच्या सजावटीत ठेवून “जुने ते सोने” या म्हणी नुसार प्राचीन साहित्य , भांडे ही आपली संस्कृती जपणारे बुऱ्हाण दाम्पत्य यांची ही सजावट लक्षवेधी ठरत आहे.


COMMENTS