• समता व बंधुत्वाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने बुद्ध जयंती साजरी.
• दिनबंधु परिवार व नेफडो संस्थेचा संयुक्त पुढाकार; राजुरा येथे कार्यक्रम उत्साहात.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,३ मे –
दिनबंधु परिवार राजुरा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजुरा येथे सामाजिक बांधिलकी जपत जिलेबी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे तालुका उपाध्यक्ष वृक्षप्रेमी भास्कर करमरकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बुद्धांच्या शांतता, समता व बंधुत्वाच्या विचारांचे स्मरण करून समाजात प्रेम, सौहार्द आणि एकात्मता वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला. गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास दिलीपभाऊ वैरागडे, संजूभाऊ, असिफ सय्यद, अशोक राव, महादेव करमनकर, नरेंद्र देशकर, सुनोजी किणगे , बलवंत ठाकरे, किशोर टेंभुणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमातून समाजात मानवता, सामाजिक ऐक्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून नागरिकांकडून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



COMMENTS