राजुरा पोलिसांचे माहिती देणाऱ्यास आवाहन.
गौतम नगरी चौफेर राजुरा – दि.१ मे राजुरा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक
५७६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५१(२), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये १ ) जयराम रामेश्वर राठोड व २ ) सोनी जयराम राठोड (दोन्ही रा. आर्वी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयराम राठोड हा मध्यम बांध्याचा असून उंची सुमारे ५ फूट ५ इंच, सावळा रंग, लांब चेहरा, बारिक डोळे व काळे केस अशी त्याची ओळख आहे. तर सोनी राठोड ही मध्यम बांध्याची, सावळ्या वर्णाची असून उंची सुमारे ५ फूट, गोल चेहरा, काळे केस अशी तिची वैशिष्ट्ये आहेत. सदर दोन्ही आरोपींनी गुन्हा घडल्यापासून फरार होत पोलिस तपास चुकवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून नागरिकांनी याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक राजुरा यांचा मोबाईल क्रमांक ७७२२००८७४७ तसेच पोलिस स्टेशन राजुरा येथील संपर्क क्रमांक ८८८८१५५५९१ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर पोलिस नियंत्रण कक्षाशी ०७१७२-२५१२०० किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर ही संपर्क साधता येईल. पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


COMMENTS