HomeNewsनागपुर डिवीजन

आरटीईतून ६५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; आज मुदतवाढ संपणार

गौतम नगरी चौफेर//शिला धोटे पुणे //: शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) राखीव जागांच्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत राज्यभरातून ६५ हजार ५१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाकरिता देण्यात आलेली मुदतवाढ गुरुवार, ३० एप्रिल रोजी संपत असून उर्वरित जागांवर पुन्हा मुदतवाढ मिळणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

आरटीई प्रवेशप्रक्रियेत निवड यादीतील विद्याथ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यापूर्वी दिलेल्या सुदतीत केवळ २८ हजार विद्याच्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. राज्यातून १ लाख ५ हजार ८९९ विद्यार्थ्यांचा निवड यादीत समावेश होता, चंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांनी आरटीई प्रवेशाची नोंदणी केली आहे, तर ९ लाख १४ हजार ८२६ इतकी आरटीईची प्रवेशक्षमता आहे, राज्यभरातून २ लाख ८९ हजार २८६ इतक्या पालकांचे अर्ज प्राप्त शाले आहेत.

आरटीई प्रवेश संथगतीने होत असल्याने दहा दिवसांची शुदतवाढ देण्यात आली, आतापर्यंत राज्यात ६५ हजार ५९९ विद्याथ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, एकूण ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्याथ्यांना प्रवेश दिला जाणार आहे,किवा सावळा सावळी पुन्हा होणार
काय /याकडे नागरिकांचे लक्ष्य लगून आहेत

COMMENTS

You cannot copy content of this page