गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – स्टेला मॅरिस स्कूल बामणवाडा राजुरा येथील कु. ज्ञानेश्वरी वाडीघरे ही ९७:४० टक्के घेऊन राजुरा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला
नुकताच सी बी एस ई १० वी चा निकाल जाहीर झाला यात शाळेचा १०० टक्के निकाल लागला १०९ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण केली यात ११ विद्यार्थी ९० टक्के च्या वर, ४७ विद्यार्थी ७५ टक्के च्या वर, ३२ विद्यार्थी प्रथम तर १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. शाळेतून कु. ज्ञानेश्वरी वाडीघरे ९७:४० टक्के घेऊन प्रथम, कु. संस्कृती कोंडेकर ९६:८० टक्के घेऊन द्वितीय व कु. मैथिली मत्ते ९६:६० टक्के घेऊन तृतीय आहे. कु. ज्ञानेश्वरी ही शाळेच्या होस्टेलची विद्यार्थीनी आहे, ती शिकवणी वर्ग व मोबाईल शिवाय हे यश संपादन केले आहे हे विशेष.
यशाचं श्रेय ती मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आई वडील यांना दिले.


COMMENTS