स्व. सुभाष वाढई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम.

HomeNewsनागपुर डिवीजन

स्व. सुभाष वाढई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम.

शेतात वृक्षारोपण व वृक्षांना राख अर्पण करून स्मृती जपण्याचा वाढई कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता. प्र.) :- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्व. सुभाष वाढई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या अस्थींच्या राखेचे नदी-नाल्यांत विसर्जन न करता शेतात लावलेल्या झाडांच्या मुळाशी अर्पण करण्याचा स्तुत्य उपक्रम वाढई कुटुंबीयांनी राबविला. दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासोबतच निसर्गाचे संरक्षण करण्याचा हा अभिनव प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखणे आणि वृक्षसंवर्धन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. हीच जाणीव ठेवून वाढई कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीला पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची जोड दिली. स्व. सुभाष वाढई यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी शेतात वृक्षारोपण करून त्या झाडांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आल्याचे जिल्हा स्मार्ट ग्राम कळमनाचे उपक्रमशील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती शशीकला वाढई, नंदकिशोर वाढई, रमाकांत वाढई, भाऊराव पाटील भोंगळे, बाळकृष्ण पाटील पिंगे (पोलीस पाटील, कळमना), निलेश बाबू वाढई (अध्यक्ष, तंटामुक्त समिती, कळमना), महादेव पाटील ताजणे (अध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ, कळमना), प्रभाकर साळवे (अध्यक्ष, हनुमान मंदिर कमिटी, कळमना), बंडू पाटील पहानपटे, मारोती आस्वले, विठ्ठल वाढई, मदन पाटील वाढई, आनंदराव वाढरे, विठ्ठल वाढरे, आनंदराव पाटील बोढाले, जयवंत वाढई, दत्तात्रय वाढई, रामकृष्ण वाढई, दिवाकर वाढई, अनिल वाढई, श्रीकांत वाढई, प्रा. दिनेश वाढरे, गणेश रमाकांत वाढई, सत्यपाल गुरनुले, शांताबाई शिवराम पाटील पहानपटे, लोपामुद्रा देवराव काळे, शोभा भाऊराव भोंगळे, आशा नंदकिशोर वाढई, गौरी नंदकिशोर वाढई यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होती.

You cannot copy content of this page