हिरापूर येथील अनुसूचित जाती पुरुष सदस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्याची मागणी

HomeNewsनागपुर डिवीजन

हिरापूर येथील अनुसूचित जाती पुरुष सदस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्याची मागणी

गौतम नगरी चौफेर(शिला धोटे) – कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या हिरापुर (सांगोडा) ग्रामपंचायत येथील अनुसुचित जाती पुरूष सदस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्या बाबात येथील तथागत बौध्द मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी राजुरा यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे, महोदय, आपणास सविनय विनंती करण्यात येत आहे की ग्रामपंचायत हीरापुर सांगोडा येथे एकुन साथ (7) सदस्यापैकी वार्ड क्रमांक (तीन ३) मध्ये सन २०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकी अगोदर अनुसुचित जाती पुरूष आरक्षित एक जागा व सर्वसाधारन स्त्री एक जागा अशा दोन जागा नेहमी राहत होत्या.

परंतु सन २०१५ आणि २०२० च्या या दोन पंच्चवारर्षीक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनुसुचित जातीची आरक्षित जागा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे अनुसुचित जातीचे प्रतिनीधीत्त्व नष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनुसुचित जातीची व लोकसंख्या ही एकुन असतांना सुध्दा अनुसुचित जातीचे लोकसंख्येच्या २५ टक्के आहे, दरम्यान असे प्रतिनिधीत्त्व मध्यंतरी संन २०१५ निवडणुकीमध्ये नााकरण्यात आले आहे व सन २०२० च्या ग्रामपचायत तरी आपण सदर तक्रारीची दखल घेऊन रद्द करण्यात आलेली अनुसुचित जातीची आरक्षित जागा परत नियीमत करावी व या समाजाला प्रतिनिधीत्त्वाची संधी बहाल करावी या आशेची मागणी येथील तथागत बुद्ध विहार युवा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे

COMMENTS

You cannot copy content of this page