गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे तारीख २१ मार्च २०२६ ला चंद्रपूर येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांच्याकडे या भागातील विविध कोल माईन्स आणि कारखान्यात स्थानिक बेरोजगार भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी मागणी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार मंत्र्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
तारीख 11 नोव्हेंबर 1968 रोजी महाराष्ट्र शासनाने स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के रोजगार देण्याचे बंधन टाकणारा पहिला शासन आदेश जारी केलेला आहे. तरीसुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाले असे होताना दिसत नाही.याचे नेमके कारण म्हणजे येणाऱ्या कंपन्या आपली मनमर्जीप्रमाणे परप्रांतीय कामगार सामावून घेतात.
त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना बेरोज करत राहावे लागत आहे. या बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याकारणाने गुन्हेगारी ही खूप मोठ्या वेगाने वाढत आहे. होणारी गुन्हेगारीची वाढ थांबवण्याकरिता स्थानिकांना रोजगार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
या वरील दोन्ही समस्या अत्यंत चिंताजनक आहे.त्याकरिता ह्या समस्या आपण जागतीने लक्ष लावून मार्गी लावाव्यात. अशी मागणी अनैशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे,चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष सरिता मालू,चंद्रपूर युवा जिल्हा अध्यक्ष चंपतभाऊ राजूरकर,उस्मान शेख,संकेत काटाईत,समीर भोयर,अजय सोयाम,अजय आत्राम, बादल टेकाम,आनंद कुंभे इत्यादींनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय नामदार रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.


COMMENTS