गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, १७ मार्च
राजुरा पंचायत समिती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली खुर्द च्या विद्यार्थांनी “चला ताडोबाला चला” या उपक्रमा अंतर्गत ताडोबा सफारी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे ताडोबा. ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारी करतांना विद्यार्थांनी विविध वन्य जीव, वनस्पती जंगल संवर्धन याबाबत माहिती घेतली. ताडोबा मध्ये विविध प्रकारचे हरिण, सांबर, चितळ, नीलगाय,मोर,वाघ, जंगली श्वान, ससा, विविध प्रजातीचे पशु पक्षी इत्यादी प्राणी बघितले. दुपारी १२ वाजता ताडोबा सफारी साठी महाराष्ट्र शासनाची गाडी शाळेत आली. मोफत शासकीय वाहनाने विद्यार्थी,शिक्षक यांनी ताडोबा सफारी केली. ताडोबा सफारी साठी वाहक संदीप पाटील व राकेश कराडे यांनी विशेष सहकार्य केले. मुलांना व्यवस्थित नेणे,त्यांना ताडोबा बद्दल माहिती देणे, विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ होत असेल तर गाडी थांबविणे असे सहकार्य केले तसेच ताडोबा सफारी साठी दोन गाडीवर दोन गाईड होते. त्यांनी सुद्धा ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्राण्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
एकंदरीत हा उपक्रम खेड्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांना मोफत ताडोबा सफारी मिळत असल्याने वन विभागाचा एक स्तुत्य उपक्रम आहे… या ताडोबा सफारी मध्ये ४० विद्यार्थी,मुख्याध्यापक संजय चिडे, शिक्षक विठ्ठल गोंडे यांचा समावेश होता.



COMMENTS