महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा.- पगारवाढ व थकीत एरियर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात विजय.

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा.- पगारवाढ व थकीत एरियर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात विजय.

ॲड दीपक चटप यांचा युक्तिवाद.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.३०
ऑगस्ट महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांच्या पगारवाढीसह थकीत एरियर्सच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णवाहिका चालकांच्या वेतनवाढीचा तसेच मागील कालावधीतील थकीत वेतन फरकाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या प्रकरणात चालकांच्या हक्कासाठी ॲड. दीपक चटप व ॲड सिद्धार्थ चपळगावकर यांनी न्यायालयीन स्तरावर प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांच्या माध्यमातून सदर प्रकरणात चालकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण विजय मिळाला असून, त्यामुळे विदर्भातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे संबंधित रुग्णवाहिका चालकांना पगारवाढ तसेच पात्रतेनुसार थकीत एरियर्सची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चालकांच्या मेहनतीला आणि त्यांच्या न्याय्य हक्काला न्याय मिळवून देणारा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या विजयाबद्दल महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांकडून ॲड. दीपक चटप, ॲड.सिद्धार्थ चपळगावकर,यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून तसेच जनसंपर्क कार्यालयात रुग्णवाहकाकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ॲड. दीपक चटप यांचे सत्कार करण्यात आले. आपल्या हक्कासाठी न्यायालयीन लढा उभारून मिळवून दिलेल्या दिलासाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

    You cannot copy content of this page