परीक्षा केंद्र रद्द केल्यास आंदोलन करू

HomeNewsनागपुर डिवीजन

परीक्षा केंद्र रद्द केल्यास आंदोलन करू

पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष : परीक्षा केंद्र कायम असल्याचे समजताच विदयार्थ्यांमध्ये समाधान
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या अभ्यासक्रमाचे परीक्षा केंद्र ४५३  चिंचोली (खुर्द) येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात हिवाळी २०२५ मध्ये सुरु होते, मात्र उन्हाळी परीक्षा केंद्र रद्द केल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये पसरतात विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत परीक्षा केंद्र रद्द झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राजुरा व कोरपना तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या चिंचोली (खुर्द) या ठिकाणी ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता कला,वाणिज्य व विज्ञान शाखेचे महाविद्यालय सुरु आहे. या महाविद्यालयात राजुरा कोरपणा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. हिवाळी परीक्षा २०२५ पूर्वी या महाविद्यालयात परीक्षा केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांना  तालुक्याच्या ठिकाणी एकमेव परीक्षा केंद्र असलेल्या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. ग्रामिण भागातून तीस ते पस्तीस किमी अंतरावरून परीक्षा केंद्रावर ये -जा करणे विद्यार्थ्यांना खुप त्रासदायक होते. याच महाविद्यालयच्या दोन विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी जात असताना दोनही विद्यार्थिनींचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यावेळेस पालकांनी व विदयार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला होता. त्यांनतर परिसरातील काही ग्राम पंचायतीने ठराव घेत ग्रामिण भागातील महाविद्यालयीन परीक्षा केंद्र छत्रपती शिवाजी कला व विज्ञान म्हविद्यालयात देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भर उन्हामध्ये तालुक्याच्या ठिकाणी ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरून जावे लागत असतात. यामध्ये बऱ्याच ठिकाणी ये-जा करण्याची वाहनाची सुविधा सुद्धा नाही, त्यात रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. तर काही विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नसल्याने परीक्षेपासून सुद्धा वंचित राहावे लागत होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत होते.

पालक व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता विद्यापीठाणे योग्य ती कार्यवाही करीत नियमाच्या चौकटीत राहून  हिवाळी 2025 परीक्षा केंद्र चिंचोली (खुर्द ) येथिल महाविद्यालयात सुरु केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु नुकतीच सदर परीक्षा केंद्र रद्द केल्याची चर्चा पसरताच विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणावर परीक्षा देणे त्रासदायक असल्याने चिंचोली येथिल छत्रपती शिवाजी महाविद्यालय परीक्षा केंद्र पूर्वरत सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा केंद्र रद्द झाले नसून चुकीच्या लोकांनी जाणीवपूर्वक संदेश पसारावीला असल्याची माहीती मिळताच विदयार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोट : आम्हा विद्यार्थ्याना छत्रपती शिवाजी महाविद्यालय चिंचोली (खुर्द )परीक्षा केंद्र 453 उन्हाळी परीक्षा २०२६ रद्द झाल्याबद्दलची माहीती मिळाली त्यामुळे आम्ही ग्रामिण भागातून शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा देणे अडचणीचे ठरत होते. जेव्हा चिंचोली येथे परीक्षा केंद्र सुरु झाले तेव्हा आमच्या ग्रामिण भागातील मुली सुद्धा मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सदर परीक्षा केंद्र रद्द झाल्यास आम्ही विदयार्थी आंदोलनाच्या तयारीत होतो. परंतु महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर परीक्षा केंद्र रद्द झाले नसून आपल्याच महाविद्यालयात परीक्षा होणार असल्याचे सांगितल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

: सुमित उपासे, विद्यार्थी


2) “विद्यार्थ्यांनी प्राचार्य सरांना परीक्षा केंद्र बंद झाल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की आपल्या परीक्षा केंद्राबाबत विद्यापीठाकडून अशी कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही. त्यामुळे उन्हाळी 2026 ची परीक्षा नेहमीप्रमाणे आपल्या विद्यमान परीक्षा केंद्रावरच आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”

: एस. एस. पडोळकर, कार्यकारी प्राचार्य

COMMENTS

You cannot copy content of this page