हरदोना खुर्द येथे तंबाखूची प्रतिकात्मक होळी !

HomeNewsनागपुर डिवीजन

हरदोना खुर्द येथे तंबाखूची प्रतिकात्मक होळी !

जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम!

   गौतम नगरी चौफेर //राजुरा बादल बेले // शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर व सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदोना खुर्द येथे तंबाखूची प्रतिकात्मक होळी हा उपक्रम राबविण्यात आला.
   या कार्यक्रमाचे उद्घाटन संजीवनी पेरगार, अंबुजा फाउंडेशन यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर जाधव यांनी अध्यक्षस्थान भुषविले.
    शाळेतील विषय शिक्षक तथा तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था अभियानाचे जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक मनिष अशोकराव मंगरूळकर यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा व उपक्रमांमागिल भूमिका विषद केली. त्याचबरोबर तंबाखूचे दुष्परिणाम आणि देशातील भयावह सद्यस्थितीसोबतच तोंडाचा कर्करोग व पूर्वकर्करोग लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक नरेश मंडोगडे, तृप्ती टिकले तथा सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

COMMENTS

You cannot copy content of this page