कायद्याच्या चौकटीत राहून लढाई  जिंकू – निलेश ताजने

HomeNewsनागपुर डिवीजन

कायद्याच्या चौकटीत राहून लढाई  जिंकू – निलेश ताजने

गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – गडचांदुर येथील प्रदुषण त्रस्त आंदोलन समीती द्वारे जेष्ठ नागरिक सभागृह येथे आम सभा  घेण्यात आली,माणीकगड सिमेंट कंपनी ही गडचांदूर शहरात कचरा डंपींग यार्ड तयार करून वातावरण दूषित करीत असून नागरीकांच्या आरोग्यांशी खेडत आहे, माणीकगड अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी विरूद्ध गेम प्लान तैयार करून आंदोलन कशा पद्धतीने करता येईल व गडचांदूर करांना या गन्दगी पासून मुक्त कशे करता येईल या साठी प्रदुषण त्रस्त संघर्ष समीती च्या वतीने आमसभा घेण्यात आली असून शहरातील विविध पक्षाच्या वतीने पदाधिकारी व नागरीकांनी आपआपले विचार मांडले, कायद्याच्या चौकटीत राहुन अल्ट्रा टेक माणीकगड सिमेंट कंपनी विरूद्ध लढाई जिंकु असे मत गडचांदुर येथील नगर अध्यक्ष  निलेश ताजने यांनी आपले विचार व्यक्त केले, माणीकगड सिमेंट कंपनीला शासनाचा पाठींबा असून कंपनी विरूद्ध लढाई जिंकायची असेल तर गेम प्लान तयार करुन शहराच्या माध्मातून एक समीती तयार करु व नगरपरीषदेच्या वतीने पाठपुरावा करून कायद्याच्या चौकटीत राहून ही लढाई। निश्चितच जिंकून गडचांदुर कारांना न्याय देऊ असे मत नगर परीषदेचे अध्यक्ष  निलेश ताजने यांनी व्यक्त केले,या सभेचे अध्यक्ष बा.ना.मोहीतकर होते.

तर प्रमुख पाहुणे नगरपरीषदेचे नगर अध्यक्ष निलेश ताज़ने जनशक्ति संघटनेचे अध्यक्ष आबीद अली, माजी पंचायत समीती सदस्य सौ,स्मिता चिताडे, माजी नगर अध्यक्षा सौ विजया लक्ष्मी डोहे, नगरपरीषदेचे उपाध्यक्ष संजय मेंडी आरोग्य सभापति तूषार बावणे, नगरसेवक, राम सेवक मोरे, सचिन भोयर, सतीश ऊपलेंचवार, माजी नगरसेवक अरून डोहे, नगरसेवक महेश आवारी, सौ,अर्चना ताई मोरे,चेतन शेंडे, सौ,सपना ताई सेलोकर, सौ.शितल धोटे, सौ.सारीका डोरलीकर,सगूना लोनगाडगे, शेख खाजाभाई, प्रदुषण त्रस्त समीतीचे सदस्य,श्री धनंजय छाजेड़,प्रहारचे जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर, मनसेचे तालुका अध्यक्ष सूरेश कांबळे डॉ, कूलभुषन मोरे, डॉ.प्रविन लोनगाडगे, व्यापारी असोशियन चे अध्यक्ष श्री हंसराज चौधरी माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार, भाऊराव पाटील आश्रम शाळेचे संचालक प्रशांत चटप व अनेक संखेने नागरीक उपस्थित होते

COMMENTS

You cannot copy content of this page