छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये किल्ले बांधणी व माहिती सादरीकरणस सोहळा.

HomeNewsनागपुर डिवीजन

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये किल्ले बांधणी व माहिती सादरीकरणस सोहळा.

गौतम नगरी चौफेर सुवर्णा बादल बेले राजुरा – १८ फेब्रुवारी सनराईस इंग्लिश स्कुल, राजुरा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन  सुंदर किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व जागरूकता निर्माण व्हावी आणि सर्जनशीलता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्दे असून विद्यार्थ्यांनी माती, कागद, रंग व इतर साहित्याच्या साहाय्याने आकर्षक किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली. किल्ल्याची प्रतिकृती अतिशय सुंदर आणि लक्ष वेधून घेणारी ठरली.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपण तयार केलेल्या किल्ल्याचा इतिहास, त्याचे महत्त्व, बांधकाम वैशिष्ट्ये आणि स्वराज्य स्थापनेतील योगदान याबाबत प्रभावी माहिती सादर केली. विद्यार्थ्यांचे आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण व अभ्यासपूर्ण माहिती यामुळे उपस्थित शिक्षक व पालक प्रभावित झाले. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्कृष्ट किल्ल्याची प्रतिकृती शाळेच्या वतीने राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी  विवेक चौधरी यांना भेट म्हणून देण्यात आली. भेट स्वीकारताना मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले तसेच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलेल्या उपक्रमाचेहि कौतुक केले. किल्ला सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करून नागरिकांना प्रेरणा मिळावी, असा शाळा प्रशासनाचा हेतू आहे.
या उपक्रमाचे उपस्थित पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडन्याचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा आमटे यांनी शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर, विधाता फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी धोटे ,  सचिव अॅड. मनोज काकडे, सहाय्यक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले.

COMMENTS

You cannot copy content of this page