– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने केले सात हजार चारशे लाडू वाटप.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – १५ फेब्रुवारी राजुरा येथील श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान हे अतिशय प्राचीन व पुरातन मंदिर असून या ठिकाणी दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा तर्फे महाशिवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने सात हजार चारशे लाडू प्रसाद म्हणुन वाटप करण्यात आले. तसेच निसर्ग, पर्यावरण व धार्मिक सण उत्सव यांचा कसा सह संबंध आहे यावर आधारित माहिती बॅनरच्या माध्यमातून लावून जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ.ओमप्रकाश गोंड, तहसीलदार तथा ट्रस्टी सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा व सुमित परतेकी, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन राजुरा यांची सपत्नीक उपस्थिती होती. तसेच अरुण धोटे, नगराध्यक्ष न.प. राजुरा, दिलीप डेरकर, उप नगराध्यक्ष न.प.राजुरा, रमेश नळे, सभापती न.प.राजुरा, योगेश्वर पारधी, स्वामी येरोलवार, मारोतराव येरणे, अध्यक्ष, देखरेख समिती, गजानन येरणे, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, तसेच देखरेख समितीचे प्रकाश बेजंकीवार, उपाध्यक्ष, भाऊराव बोबडे, सचिव, प्रशांत गुंडावार, सह सचिव, सदस्य भाऊराव खाडे, बापूजी कुचणकर, रामचंद्र आदे , हर्षल क्षीरसागर क्रीडा शिक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. याकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, संघटक यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रतीक काकडे, प्रीतम काकडे, सागर पाटील यांनी स्वयंप्रेरणेने भाविकांना केळी वाटप केले. यावेळी नरेंद्र देशकर, श्रीरंग ढोबळे, मनोज तेलिवार, बबलू चव्हाण, रवी बुटले, प्रतीक काकडे, विलास कुंदोजवार, ईश्वर वडस्कर, शंकर बुऱ्हाण, माधुरी गद्दमवार, मंदा बुऱ्हाण, आकाश वाटेकर, प्रदीप भावे, प्रतिभा भावे, साक्षी भाके, भास्कर करमणकर, आकनुरवार, संतोष देरकर आदींची उपस्थिती होती.



COMMENTS