गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा- एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील वानामती केंद्रातील एकूण ७० प्रशिक्षणार्थी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन येथील अंगणवाडी क्र.२ च्या अंगणवाडी केंद्राची गुणवत्ता तपासणी व अभ्यास दौऱ्याचे औचित्य साधून अंगणवाडीला नुकतीच भेट दिली. व सुसज्ज अंगणवाडी केंद्रातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. या भेटी दरम्यान अंगणवाडी केंद्रातील कामकाज, डिजिटल अंगणवाडी, बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण वाटिका परसबाग, पालेभाज्यांचे महत्त्व, मोबाईलचे ऑनलाइन पोषण ट्रेकर, पोषण आहार व पुनर्वसन गावासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेतली. बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी व अंगणवाडीतील बालकांशी मनसोक्त संवाद साधला व विभागाशी संबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात आली. अंगणवाडी केंद्रात राबवीत असलेल्या नाविन्यपूर्ण विविध स्तुत्य उपक्रमाबाबत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. व स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी शहरी बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन मोहुर्ले, ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मेंढे , पर्यवेक्षिका सुधा श्रीकोंडवार, ज्ञानेश्वरी जीभकाटे, अंगणवाडी सेविका सुरेखा लांबट, उषा गाढवे, सरपंच देविदास ठवकर, उपसरपंच संतोष कारेमोरे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिक चवरे, ग्रामपंचायत अधिकारी पी.जी. वैद्य, ग्रामपंचायत सदस्या संगीता लांडगे, उज्वला शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अंगणवाडी सेविका सुरेखा लांबट, उषा गाढवे, सुजाता चवरे, कल्पना वैद्य, आरती बदने, सत्यवान लांबट, सचिन लांबट, सम्यक चवरे, कुंदा चवरे ,सोनिया चवरे यांनी सहकार्य केले.


COMMENTS