वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदारांना निवेदन

HomeNewsनागपुर डिवीजन

वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदारांना निवेदन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील रेतीघाट सुरू करून घरकूल लाभार्थी यांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येवून मोर्चा आंदोलन करेल. अशा आशयाचे चे निवेदन पत्र आज दिनांक 11/2/2026 ला मा तहसिलदार यांना देण्यात आले. पवनी तालूक्यातील जवळपास २०० लाभार्थ्यांनी मागील दोन महिन्यापासून घरकुल बांधकामासाठी रेतीची मागणी केली असून रेती अभावी घरबांधने थांबलेली आहेत रेतो घाट बंध असून सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे परंतू तहसील कार्यालयामार्फत अनेक लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून दिली जात नसून तहसील कार्यालयाकडून टाळाटाळीचे उत्तरे दिले जात आहेत यामुळे घरकुल लाभार्थी यांना बाहेरून रेती विकत घ्यावी लागत आहे यामुळे लाभार्थी यांना जास्तीचे अधिकचे पैसे रेतीमाफीया यांना द्यावे लागत आहेत तहसील कार्यालयामार्फत रेती घाट कमी दिवसासाठी सुरू करण्यात आले होते पंधरा दिवसापासून रेती घाट बंद असून लाभार्थी घरकुल बांधकाम कसे करणार असा प्रश्न तालुक्यात लाभार्थ्यांना निर्माण झाला आहे. तसेच वल्नी रेती घाटावरती पाणी असून रेती उपसा करता येत नाही त्यामुळे रूयाळ/सिंधपुरी घाटावरून रेती उपलब्ध करून देण्यात यावे. जुनोना, रूयाल, वल्नी, धानोरी, कोरंबी, उमरी अशी सर्व घाटे सुरू करून लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावी व तसं परिपत्रक काढून लाभार्थ्यांना दोन दिवसातरेती उपलब्ध करून न दिल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येऊन मोर्चा आंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असे निवेदन तहसिलदार साळवे साहेब व जिल्हाधिकारी भंडारा यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती डॉ .सुनील जिवनतारे यांचे नेतृत्वात व संगदिप देशपांडे तालुका अध्यक्ष, मार्तंड गजघाटे सर, धर्मदास भांबोरे, एकनाथ मेश्राम, माणिक गजभिये सैफूद्दीन खान यांच्या समवेत निवेदन देण्यात आले .

COMMENTS

You cannot copy content of this page