गौतम नगरी चौफेर सिध्देश्वर केंद्रे गडचांदूर – चा विद्यार्थी नागपूर येथील धरमपेठ जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्सच्या एमएमए क्लबकडून मपुसा (गोवा) येथे आयोजित हाय-फाय एमएमए चॅम्पियनशिप स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील शिवम शेखर उर्फ शमी नंदवानी या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंशी कडवी झुंज देत शिवमने आपले कौशल्य, ताकद व शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यावर मात करत ही घवघवीत कामगिरी साध्य केली. या यशामुळे शिवमने केवळ आपल्या कॉलेजचेच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढवला आहे. शिवम नंदवानी हा नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व कठोर मेहनतीच्या बळावर या यशापर्यंत पोहोचला असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा त्याचा मानस आहे. या यशाबद्दल शिवमचे सर्वत्र अभिनंदन होत असून, कॉलेज प्रशासन, प्रशिक्षक, मित्रपरिवार व कुटुंबीयांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


COMMENTS