– पंचायत समिती राजुरा चे यशस्वी आयोजन.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – ९ फेब्रुवारी दि. ६ व ७ फेब्रुवारी ला दोन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव जि.प.उच्च प्राथमिक शाळा धोपटाळा टाऊन च्या प्रांगणावर जि.प. प्राथमिक शाळा धोपटाळा, जि.प.उच्च प्राथमिक शाळा श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहाने पार पडल्या. यात पाच बीटातील चारशे शिक्षक व पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. मैदानावर कब्बडी, खो-खो व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. सोबतच सांस्कृतिक स्पर्धा मनोरंजन सभागृहात पार पडल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुनिल ऊरकुडे, माजी सभापती जि.प.चंद्रपूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डॉ. भागवत रेजीवाड, संवर्ग विकास अधिकारी पं.स. राजुरा, इलियास हुसैन क्षेत्रिय महाप्रबंधक बल्लारपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत , श्रीमती मैनाबाई नन्नावरे सरपंच ग्रा.पं.धोपटाळा , मंगला तोडे गटशिक्षणाधिकारी पं.स. राजुरा, सावनकुमार चालखुरे शिक्षणविस्तार अधिकारी बीट कढोली, विशाल शिंपी शिक्षणविस्तार अधिकारी बीट पांढरपौनी, हरिदास झाडे, सरपंच माथरा यांच्या उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दिनेश कवाडे,मुख्याध्यापक जि.प.उच्च. प्राथ. शाळा धोपटाळा टाऊन, माधुरी कवाडे शिक्षिका, प्रिती दौरैवार शिक्षिका, निलेश कुळमेथे शिक्षक तसेच जि.प प्राथ. शाळा धोपटाळा येथिल सुनिता टिपले मुख्याध्यापिका , प्रशांत ढवळे शिक्षक, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथील मनोहर वाघमारे मुख्याध्यापक, वर्षा राठोड शिक्षिका, मनिषा धानोरकर शिक्षिका, प्रज्ञा कुमार धोटे तसेच धोपटाळा येथिल सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता टिपले मु.अ. धोपटाळा तथा निलेश कुळमेथे शिक्षक धोपटाळा टाऊन यांनी केले. तर प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी मंगला तोडे यांनी व आभारप्रदर्शन प्रशांत ढवळे शिक्षक जि.प. शाळा धोपटाळा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशवितेकरिता जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य , विविध शिक्षक संघटना , गट साधन केंद्रातील साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, सर्व मुख्याध्यापक आदींचे सहकार्य लाभले.


COMMENTS