अत्यंत अमानवी वागणूक देऊन मागील दोन वर्षापासून कुलूप बंद खोलीत ठेवून आई व बहिणीला दिल्या नरक यातना…

HomeNewsनागपुर डिवीजन

अत्यंत अमानवी वागणूक देऊन मागील दोन वर्षापासून कुलूप बंद खोलीत ठेवून आई व बहिणीला दिल्या नरक यातना…

पाखरसांगवी शिवारातील रत्नापूर नगरातील घटना.
लोकाधिकारप्रमुख तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्यामुळे झाली या दोन महिलांची नरका मधून सुटका.

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे लातूर : दोन वर्षापासून कुलूप बंद खोलीत ठेवलेल्या दोन महिलांची लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक   अमोल  तांबे यांची भेट घेऊन लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी नरक यातनेतून त्या दोन महिलांची सुटका केली आहे!
अत्यंत अमानवी वागणूक देऊन मागील दोन वर्षापासून कुलूप बंद खोलीत दोन महिला ठेवल्या असल्याची माहिती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांना एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रत्यक्ष भेटून दिली होती. आणि त्या व्यक्तीने सांगितले की आम्ही या दोन महिलांची सुटका व्हावी म्हणून काही जणांना जाऊन भेटलो मात्र हे आपण करू शकत नाही असे त्यांनी सांगितल्याचेही त्या व्यक्तीने व्यंकटराव पनाळे यांना सांगितले. मात्र काही जणांनी हे धाडसाचे काम शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा पत्रकार व्यंकटराव पनाळे यांना भेटून सांगा ते नक्की मदत करतील असे सांगितल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीकडून पनाळे यांनी घटनास्थळ त्याच दिवशी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान घटनास्थळावर जाऊन पाहिले. जन्म दिलेल्या आई व बहिणीला दोन्ही भावांनी मिळून अत्यंत नरक यातना दिल्याचे स्पष्टपणे दिसले. 

या दोन महिलांना या नरकयातनेतून मुक्तता मिळवून देण्यासाठी लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी व्यंकटराव पनाळे आणि त्यांचे मित्र शरद झरे यांना सोबत घेऊन एस. पी . अमोल तांबे यांना प्रत्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटून ही गंभीर आणि अतिशय निर्दयी व मानव अधिकाराचे उल्लंघन करणारी अशी घटना सांगितल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्याच दिवशी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पीएसआय तिडके साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सदानंद योगी व प्रकाश जाधव यांना सोबत घेऊन जाऊन प्रत्यक्ष ते घटनास्थळ वेंकटराव पनाळे यांनी त्यांना दाखवले. तेव्हा तिडके साहेब यांनी आपण उद्या सकाळी ११ वाजता ही कार्यवाही करू असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पीएसआय भालचंद्र तिडके साहेब, पोलीस हवालदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, निहाल मणियार, महिला हवालदार लता गिरी, महिला बालकल्याणच्या श्रीमती नागमोडे, आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक यांनी दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर दोन महिलांना या नरकयातनेतून मुक्त करण्याची पोलीस कार्यवाही केली. या जागेवर एका खोलीचे बांधकाम केलेले असून त्या खोलीमध्ये आतच संडास बांधलेला आहे.

खोलीच्या बाहेरून समोरच्या बाजूला एक चवाळे बांधलेले असून दाराला कुलूप लावलेले आहे. खिडकीच्या जवळ चवाळ्याला एक फुटाचे छिद्र ठेवले आहे. आणि या छिद्रातून त्या बंदिस्त महिलेचा एक मुलगा दररोज येऊन जेवणाचा डबा आणि पाण्याच्या बाटल्या टाकून जायचा. पोलिसांनी त्या दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा उघडला. तेव्हा आतले घाणीचे साम्राज्य सर्वांना दिसून आले. संपूर्ण रूममध्ये घाण पसरलेली, पाण्याच्या बाटल्याचा ढिगारा, आत झोपण्यासाठी सुद्धा नीट जागा नाही. प्रचंड दुर्गंधी पसरलेली. दरवाजा जवळ क्षणभर सुद्धा उभे राहू शकणार नाही एवढी भयानक अवस्था.

COMMENTS

You cannot copy content of this page