गडचांदूर – राज्यस्तरासाठी निवड – प्रथम क्रमांक पटकावला
गौतम नगरी चौफेर – आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत शासकीय आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 13, 14 व 15 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडले. या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत उच्च माध्यमिक गटामधून कार्बन पदार्थ उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गडचांदूर यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. शाहबाज खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी कु. पल्लवी राठोड व कु. वेदिका येवकार यांनी आपल्या वैज्ञानिक संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली. या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले असून राज्यस्तरावरही आश्रमशाळा उज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


COMMENTS